Diwali Celebration with International Students 2021
शिवाजी विद्यापीठातील प्रवेशित असलेल्या सर्व परदेशी विद्यार्थ्यांच्या समवेत कुलगुरूची दिवाळी साजरी
शिवाजी विद्यापीठामध्ये अधिविभागामधील अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असणाÚया सर्व परदेशी विद्यार्थ्यांच्या बरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षातील (The International Students Diwali Celebration function) दिवाळी सणाचा कार्येक्रम सोमवार दि. 01/11/2021 रोजी अतिथीगृह, शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी संपन्न झाला. सदरच्या कार्येक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरूसाो प्रा. (डॉ.) डी.टी.शिर्के, मा. प्र-कुलगुरूसाो प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील, मा. कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, आयक्यूएसीचे संचालक प्रा. एम.एस. देशमुख, डॉ. विजय घोरपडे, प्रा. ए. ए. देशमुख, इंटरनॅशनल अफेअर्स सेल मधील टास्क फोर्स सदस्य प्रा. ए. एम. गुरव, प्रा. एस. बी. सादळे, प्रा. ए.डी.जाधव, तसेच पीएच.डी रिसर्च गाईड, संबंधित अधिविभागामधील विभागप्रमुख, इंटरनॅशनल स्टुडंन्ट हॉस्टेलचे रेक्टर डॉ. जे. बी. यादव, इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा.डॉ. ए. व्ही. घुले व सर्व प्रवेशित परदेशी उपस्थित होते.
त्या अनुषंगाने या कार्येक्रमास्थळी आर्कषक रांगोळी, विविध ठिकाणी छोटे-मोठे आकाश कंदील लावून सजावट करण्यात आलेली होती. सर्व इंटरनॅशनल स्टुडंन्ट यांच्याकडून परिसरामध्ये ठेवण्यात आलेल्या पणत्या - दिपप्रज्वलित करण्यात आले. कार्येक्रमाच्या सुरवातीस इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. डॉ. ए. व्ही. घुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मान्यवराच्या हस्ते सुशोभित दिवाळी पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. मा. कुलगुरू, मा. प्र- कुलगुरू मा. कुलसचिव तसेच मान्यवर उपस्थित मान्यवरांनी सर्व परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सर्व परदेशी विद्यार्थ्यांना मिठाई बॉक्स देवून दिवाळी सणाच्या व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्येकमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ए. व्ही. घुले यांनी केले व उपस्थित मान्यवराचे आभार आणि सहयोगा बद्दल डॉ. जे. बी. यादव यांनी आभार प्रकट केले. कार्येक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेवुन दिवाळी सिलेब्रेशन या कार्येक्रमाची सांगता केली.
|