International Affairs Cell
Diwali Celebration with International Students 2019

 

परदेशी विद्याथ्र्यांसमवेत कुलगुरूची दिवाळी साजरी प्र.कुलगुरू,कुलसचिव यांची उपस्थिती :   भारतीय संस्कृतीची माहिती

शिवाजी विद्यापीठातील परदेशी विद्याथ्र्याबरोबर दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाचा वर्षोतील परदेशी विद्याथ्र्यारोबरचा दिवाळी सण दिः.02/11/2019 रोजी अतिथीगृह निवासस्थान शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी साजरा करण्यात आला.  या कार्येक्रमात शिवाजी विद्यापीठाचे मा.कुलगुरू प्रा. डाॅ. देवानंद शिंदे, प्रा. डाॅ.  प्र.कुलगुरू श्री. डी. टी. शिर्के, डाॅ.व्ही.डी. नांदवडेकर, प्रा.डाॅ. डी.के.गायकवाड व डाॅ. एन.जे. बनसोडे मान्यवर उपस्थित होते. तसेच पी. एच. डी परदेशी विद्याथ्र्यांचे मार्गदर्शक, इंटरनॅशनल स्टुडंन्ट हाॅस्टेल रेक्टर डाॅ. जे. बी. यादव व इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. डाॅ.  ए. व्ही. घुले उपस्थित होते.

त्याअनुषंगाने या कार्येक्रमात इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. डाॅ. ए. व्ही. घुले यांनी उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करून मान्यवराचे हस्ते दिवाळी पणत्या प्रज्वलित करण्यात आलेत.  त्यानंतर मा. कुलगुरू प्रा. डाॅ.  देवानंद शिंदे, प्रा. डाॅ. प्र.कुलगुरू श्री. डी. टी. शिर्के, डाॅ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी प्रथमता भारतीय संस्कृतीतील दिवाळी सणाचे महत्त्व, रूढी.परंपरा, रितरिवाज, पद्धती यासर्वांची माहिती दिली. त्यानंतर परदेशी विद्याथ्र्यांना  मा. कुलगुरू प्रा. डाॅ.  देवानंद शिंदे यांच्या हस्ते सर्व परदेशी विद्याथ्र्यांना  मिठाई देवून दिवाळी सणाच्या व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.  तसेच सदर कार्येक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेवुन कार्येक्रमाची सांगता करण्यात आली. कार्येक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. ए. व्ही. घुले यांनी केले. कार्येक्रमाच्या स्थळी विविध ठिकाणी आकाश कंदील व दिवाळी पणत्या लावण्यात आलेले होते.  

 

   

 


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default