Department of Marathi
Research Projects

 

विभागातील प्राध्यापकांकडील संशोधन प्रकल्प

प्रा. ल. रा. नसिराबादकर  
1.    १९५० नंतर मराठीतील वाङ्मयविषयक  नियतकालिकांची सूची
2.    आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास: १८१८ते २०००

प्रा. डॉ.रविंद्र नारायण ठाकूर 
1.    विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यामार्फत डॉ. विनोद राठोड  यांच्या कादंबरीची समाजशास्त्रीय चिकित्सा  

डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले.  
1.    ‘दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश’ या शीर्षकाचा प्रकल्प महाराष्ट्र  शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्याकडून देण्यात आला होता. सदर प्रकल्पासाठी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले. २००३  ते २०१५ या कालावधीत प्रस्तुत प्रकल्प पूर्ण करण्यात आला. गंगाधर पानतावणे यांनी संपादित केलेल्या ‘दलित-ग्रामीण साहित्य’ शब्दकोशातून सदर प्रकल्प प्रकाशित झाला आहे.
2.    Impact of wild sericulture on Socio Economic development of Tribal and  Economically weaker sections and women Empowerment from western Maharashtra सी .एस. आय. आर. सी. एस. आय. आर. नवी दिल्ली यांच्या अनुदानातून एक कोटी दोन लाख रुपये मंजूर. या  प्रकल्पाचा कालावधी २०१२ ते २०१४ पर्यंत होता. प्राणिशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर यांच्या वतीने संयुक्तपणे या प्रकल्पाचे काम केले.  

डॉ. विश्वनाथ काशिनाथ शिंदे 
1.    ‘मराठी तमाशा आणि वगनाट्य’ या प्रकल्पासाठी यु.जी.सी. मार्फत वीस हजार रुपये अनुदान  मंजूर. प्रकल्पाचे काम पूर्ण.
2.    ‘मराठी दंतकथा’ या प्रकल्पासाठी शि. विद्या असाइन्ड अनुदान यांच्या मार्फत सात हजार रुपये मंजूर.काम पूर्ण 
3.    ‘मोनोग्राफी ऑफ मराठी पोवाडा’ या प्रकल्पासाठी साऊथ हे. कल्वरल झोन भारत सरकार पुरस्कृत  संस्था, नागपूर यांच्या मार्फत वीस हजार रुपये मंजूर.प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. 
4.    ‘सुखदेव खंडोबा आणि वाघ्या मुरळी’  या प्रकल्पासाठी यु.जी.सी मार्फत आठ लाख सत्तेचाळीस हजार सहाशे  रुपये अनुदान मंजूर.प्रकल्पाचे काम पूर्ण. 
5.    ‘महाराष्ट्रातील भटक्या जमातींच्या बोलीचा अभ्यास’ या प्रकल्पासाठी यु.जी.सी कडून आठ लाख वीस हजार एकशे दहा रुपये अनुदान मंजूर झाले.
    
प्रा. डॉ. राजन गणपती गवस 
1.    ‘अंधश्रद्धेच्या  भाषिक व्यवस्थेचा शोध’ प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दहा लाख चार हजार चारशे रुपये इतकी रक्कम मंजूर.
2.    ‘गुरुवर्य कृष्णराव केळूसकर समग्र वाङ्मय’ प्रकल्प या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचेकडुन बारा लाख रुपये मंजूर. 
3.    Cultural practices, the folklore and dialectics of generic trading communities and  baluterdars of Kolhapur district -An Analytical study या प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोगयांच्याकडून १५ लाख रुपये मंजूर. 

प्रा. डॉ. रणधीर श्रीमंत शिंदे    
1.    ‘बा.सी.मर्ढेकरांच्या कवितेची शैली विज्ञान एक दृष्टिकोनातून अभ्यास व त्याचा नवकवितेवरील प्रभाव’ या प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीकडून अनुदान मंजूर.
2.    ‘बौद्ध तत्त्वज्ञानाचा मराठी संत कवितेवरील प्रभाव’या प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडुन दहा लाख सहासश्त हजार नऊशे रुपये अनुदान मंजूर.
3.    ‘ग. दि.माडगूळकर गौरवग्रंथ’ या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी सहा लाख रुपये मंजूर.
4.    ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय’ या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचेकडून पाच लाख रुपये मंजूर. 
5.    ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित वाङ्मय’या अभ्यास  प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेकडुन  एक लाख बावन्न हजार रुपये रक्कम  मंजूर.
6.    Cultural practices, the folklore and dialectics of generic trading communities and baluterdars of Kolhapur या प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडुन पंधरा लाख  रुपये रक्कम मंजूर.

प्रा. डॉ.नंदकुमार विष्णू मोरे 
1.    ‘भाषिक दूरशिक्षण आणि संप्रेषण तंत्रज्ञान’ या लघु स्वरुपातील प्रकल्पसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी दहा लाख रुपये मंजूर. सदर प्रकल्प २०१३ते २०१५ या कालावधीत पूर्ण.
2.    ‘चंदगडी बोली इतिहास आणि भूगोल’ या प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून दहा लाख रुपये मंजूर. २०१५ते २०१८ या कालावधीत सदर प्रकल्प पूर्ण. 
3.    ‘कोल्हापूर जिल्ह्यातील अलुतेदार बलुतेदार यांची भाषा व संस्कृती यांचा अभ्यास’ या प्रकल्पासाठी भारतीय मानव्यविद्या संशोधन केंद्र, नवी दिल्ली यांनी रुपये पंधरा लाख रुपये मंजूर केले. २०१५ ते २०१८या कलावधीत सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला.  
4.    ‘मराठी संस्थानाचा इतिहास’ या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडून बारा लाख रुपये मंजूर. सदर प्रकल्पाचे काम सुरू. 
5.    ‘मराठी राज्याचे भाषिक आणि वाङ्‌मयीन कार्य’ या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर एक लाख पंचवीस हजार रुपये इतके रुपये  मंजूर केली. 
6.    महाराष्ट्रातील लोककलांचे संकलन आणि संशोधन( कोल्हापूर, सांगली, सातारा) या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन मुंबई यांनी पाच लाख रूपये रक्कम मंजूर. 
7.    चंदगडी बोलीचा समाजभाषा वैज्ञानिक अभ्यास या प्रकल्पासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचेकडुन चार लाख पन्नास हजार रुपये रक्कम  मंजूर केली होती. याचा कालावधी २०१९ते २०२० होता.  


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default