विभागाकडून देण्यात येणारे पुरस्कार
म. सु. पाटील पुरस्कार
म. सु. पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाकडे रुपये पाच लक्ष इतकी रक्कम ‘डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कारा’साठी देणगी म्हणून देण्यात आली आहे. या रकमेच्या व्याजातून रुपये पन्नास हजार (50,000/-) चा पुरस्कार मराठीतील नामवंत समीक्षक/ समीक्षा ग्रंथाला हा पुरस्कार देण्यात येतो.
सन 17 जानेवारी 2020 रोजी ‘डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार’ मराठीतील जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ (औरंगाबाद) यांना जेष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पंडीत आवळीकर काव्य पुरस्कार
पंडीत आवळीकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाकडे रुपये दहा हजार इतकी रक्कम पडीत आवळीकर काव्य पुरस्कारासाठी देणगी म्हणून देण्यात आली आहे. या रकमेच्या व्याजातून रुपये एक हजारचा पुरस्कार मराठीतील कवितासंग्रहाला सन 2014-15 पासून देण्यात येत आहे.
सन 2014-15 चा ‘पंडीत आवळीकर काव्य पुरस्कार गणेश वसईकर यांच्या ‘मधल्या मध्ये’ कवितासंग्रहास, सन 2016-17 साठी दिनकर मनवर यांच्या ‘अजूनही बरंच काही’, सन 2018-19 साठी सुप्रिया आवारे यांच्या ‘न बांधल्या जाणाऱ्या घरात’ आणि सन 2020 चा नामदेव कोळी यांच्य. ‘काळोखाच्या कविता’ या संग्रहांना प्रदान करण्यात आला.
|